चार दिवसात तीन व्यापाऱ्यांच्या कार मधून लाखोंचा ऐवज लंपास करण्यात आला. शिवाय काही दिवसांपूर्वी एका व्यापाऱ्याच्या परिवारावर जीवघेणा हल्ला करण्यात आला या सर्व घटना पाहता गुन्हेगारांनी शहरातील व्यापाऱ्यांना टार्गेट केले असल्याचे दिसत आहे. एक नंतर एक घटना घडत आहे. मात्र या चारही घटना मध्ये एकही आरोपी पकडण्यात पोलिसांना यश मिळालेले नाही. त्या मुळे पोलिसांच्या कार्यशैलीवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. लवकरच या गुन्हेगारांच्या मुसक्या अवळणे गरजेचे आहे.अन्यथा अशा घटनेची पुनरावृत्ती नाकारता येत नाही.
व्यापाऱ्याला लक्ष करून लाखोंचे रोकड क्षणात लंपास...
औरंगाबाद शहराच्या काही अंतरावरच वाळूज, शेंद्रा, चिकलठाणा, चितेगाव. अशा औद्योगिक वसाहती आहेत. या अनुशनगणे अनेक व्यापारी शहरात स्थायिक झाले आहेत. तर जुना मोंढा परिसरात आजही होलसेल व्यापार मोठ्या प्रमाणात होत असल्याने परिसरात व्यापाऱ्यांची आर्थिक देवाण-घेवाण होत असते.यामूळे मोंढा व तेथील व्यापाऱ्याला गुन्हेगार लक्ष करून लाखोंचे रोकड क्षणात लंपास करीत आहेत. १३ फेब्रुवारी ( बुधवारी ) मो मोंढ्यातील सुमतीलाल गुगले हे दुकान बंद करून जात असताना ऑइल गळत असल्याची थाप मारत त्यांच्या कार मध्ये ठेवलेली सव्वादोन लाख रुपय रोख असलेली बॅग लंपास करण्यात आली. या घटनेला ४८ तासही उलटत नाही तर शुक्रवारी रात्री पावणेआकरा वाजेच्या दरम्यान जुना मोंढ्यापासून काही अंतरावर असलेल्या आकाशवाणी चौकात हॉटेल मध्ये जेवणासाठी आलेल्या एका परीवारास अशीच थाप मारून गाडीतील बॅग लंपास करण्यात आली. सुदैवाने त्या बागेत रोख रक्कम नव्हती म्हणून चोरटयांनी ती बॅग पुढे जाऊन फेकून दिली.
व्यापाऱ्यांना लुटण्याच्या एका पाठोपाठ तीन घटना...
या घटनेच्या १२ तासातच तिसरी घटना घडली ती मोंढा नाका सिग्नल जवळ मोंढ्यातील फर्निचर चे व्यापारी मनोहर अग्रवाल हे घरातून त्यांच्या कार मधून जात असताना, ऑइल गळत असल्याची थाप मारून कार मधील तब्बल पाच लाख रुपयांची रोकड, महत्वाची कागदपत्रे लंपास करण्यात आली. या पूर्वी शहरातील उद्योजक छाजेड यांच्या परिवारावर झालेल्या हल्ल्यातील आरोपी पर्यंत पोलीस पोहोचली नसताना व्यापाऱ्यांना लुटण्याच्या एका पाठोपाठ तीन घटना घडल्याने शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
शहरात दिवसा ढवळ्या अशा घटना घडत असल्याने पोलिसांच्या कार्यशैलीवर देखील प्रश्नचिन्ह उपस्तीत करण्यात येत आहे. नागरिकांना मुक्त श्वास घेण्यासाठी अशा गुन्हेगारांना लवकरात लवकर गजाआड करणे गरजेचे झाले आहे.अन्यथा अशा घटनांची पुनरावृत्ती होतच राहील एवढे मात्र नक्की.